रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
जळगाव :- मेहुणबारे पोलीस स्टेशन गुरनं . २७१/२०२२ भांदवि कलम ३०२ नुसार दि . १६.१२.२०२२ रोजी १६.४५ वा दाखल करण्यात आला होता . त्यातील तक्रारदार दिपक दगा गढरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , धुळे चाळीसगाव रोडने त्यांचे मावसे मयत दगडु वामन खैरनार ( गढरी ) वय ५२ रा . तिरपोळे हे रेशन घेवुन तिरपोळे रोडकडे येत असतांना नमुद ठिकाणी यातील आरोपी मजकुर सचिन राजेंद्र चव्हाण रा मेहुणबारे याने मयताचा मुलगा जगदिश याने ३ महिन्यांपूर्वी आरोपीचे बहिणीशी पळुन जावुन प्रेमविवाह केल्याचा कारणावरुन राग धरुन धारधार हत्यार कोयत्याने मानेवर वार करुन जिवे ठार मारुन घटनाटिकाणी हत्यार सोडुन पळुन गेला वगैरे मजकुरचे तक्रारीवरुन नमुद कलमान्वये गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता . व पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक श्री विष्णु बी . आव्हाड हे करित होते . दरम्यान गुन्हयातील पळून गेलेल्या सचिन चव्हाण या आरोपीताचा शोध सुरु होता . नमुद आरोपी नामे सचिन राजेंद्र चव्हाण हा नगरदेवळा गावी रेल्वेस्टेशन भागात असल्याबाबत गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने मेहुणबारे पोलीस स्टेशन कडील पोउपनि / राजु सांगळे , पोकाँ / शैलेश माळी , पोकाँ / गोरख चकोर , पोकाँ / जितुसिंग परदेशी अशांना रवाना करुन त्यास नगरदेवळा येथुन ताब्यात घेण्यात आले . त्यावेळी त्याने विचारपुस दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दि . १८.१२.२०२२ रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली . दरम्यान अटकेत असतांना चौकशीदरम्यान त्यास त्याचा मित्र सागर सुनिल सुर्यवंशी याने मयत दगडु वामन खैरनार ( गढरी ) यांचेबाबत वेळोवेळी माहिती दिल्याने व कॉल डिटेल्स तसेच तांत्रिक पुराव्याचे आधारे त्याचा मित्र सागर सुनिल सुर्यवंशी . वय १८ वर्षे यास नमुद गुन्हयात ताब्यात घेवुन दि .१ ९ .१२.२०२२ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली . तसेच त्याने देखील गुन्हयाची कबुली दिल्याने दोघांना आज रोजी मा . चाळीसगाव न्यायालयात समक्ष हजर केले असता मा . न्यायालयाने त्यांची दि . २३.१२.२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे . नमुद गुन्हयात मा . पोलीस अधिक्षक सो , जळगाव व मा . अपर पोलीस अधिक्षक सो , चाळीसगाव परिमंडळ , चाळीसगाव यांच्या सुचना मा . सहा . पोलीस अधिक्षक , चाळीसगाव भाग , चाळीसगाव यांचे मार्गदर्शन तसेच मा . पोलीस निरीक्षक स्थागुशा , जळगाव यांचे सहकार्याने गुन्हयाचा तपास सुरु असतांना गुन्ह्यातील आरोपी अटक करुन दुसरा आरोपी निष्पन्न करणेकामी मेहुणबारे पोलीस स्टेशन कडील तपास अधिकारी सहा . पो.नि. / विष्णु बी . आव्हाड , पोउपनि / प्रकाश चव्हाण , पोउपनि / राजु सांगळे , पोहेकाँ / अरुण पाटील , पोकाँ / गोरख चकोर , पोकाँ / कमलेश राजपुत , पोकाँ / शैलेश माळी , पोकाँ / जितु परदेशी , पोकाँ / हनुमंत वाघेरे अशांनी तपास कौशल्य वापरुन गुन्हयातील आरोपी मजकुर यास अटक करुन कामगिरी करुन दाखविली आहे .


0 टिप्पण्या