Ticker

6/recent/ticker-posts

कृषि प्रदर्शनीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावाजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


वर्धा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग व आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन 27 ते 31 डिसेंबर दरम्यान विद्यापीठ क्रिडांगण डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनीला लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या प्रदर्शनीत तेलबिया, पाणलोट फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि अभियांत्रिकी ईत्यादी विभागाची दालने तसेच इतर सलग्न संस्थासह, कृषि निविष्ठा व कृषि औजारे यांची दालने राहणार आहे. दि.27 ते 31 डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी 2 ते 4 वाजता शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद, प्रगतिशील शेतकऱ्यांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीतील कृषि पुरक व्यवसाय दालने तथा कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने प्रदर्शनीस भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादाई तसेच शेतकऱ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. ही दालने या कृषि प्रदर्शनीतील मुख्य आकर्षण आहे. या शिवाय गटशेती, करार शेती, स्वयं सहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादीत केलेली कृषि आधारीत उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादीची अभिनव दालने सुध्दा उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनीत 300 च्या जवळपास दालने उपलब्ध राहणार असून ही कृषि प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
जिल्ह्याती सर्व शेतकरी, कृषिशी निगडीत मंडळीनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विद्यापीठीचे विस्तार संचालक डॉ.धनराज उंदिरवाडे, कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जिवन कतोरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या