रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
पुणे :- वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वतर्फे खेड तालुका कार्यकारणी निवडी संदर्भात चाकण या ठिकाणी तालुका, आळंदी शहर, चाकण शहर व राजगुरुनगर शहर या ठिकाणच्या मुलाखती चाकण या ठिकाणी घेण्यात आल्या. मुलाखतीस वंचित बहुजन आघाडी पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्यासोबत निवडणूक निरीक्षक बाबासाहेब कांबळे, उत्तम वनशिव, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाईन, नवनाथ गायकवाड, ॲड. वैभव कांबळे, रेवननाथ वेताळ, सतीश साळवे, गोविंद कांबळे व खेड तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते मुलाखतीसाठी हजर होते.
विशेष म्हणजे तरुण कार्यकर्ते व वय वर्ष 65 पर्यंतच्या लोकांनी मुलाखतीसाठी वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करण्यासाठी उत्साह दाखवला. याप्रसंगी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रबोधनकार सुधाकरजी अभंग, दत्ताशेठ कांबळे, महिंद्र नाईक नवरे, भीमराव गायकवाड, गणेश भोसले, जेष्ठ कार्यकर्ते गणपत भोसले, डॉ. देवेंद्र ओव्हाळ, सचिन साबळे, नामदेव वाघचौरे, गौतम साबळे, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब मोरे, विशाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या