सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : जिल्हा जात पडताळणी कार्यालयाच्यावतीने एक दिवसीय जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्जाबाबत वायगाव येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
समाज कल्याण आयुक्तालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत मंडणगड पॅटर्ननुसार जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता स्व.भैय्यासाहेब उरकांदे कनिष्ठ महाविद्यालय, वायगाव (निपानी) येथे जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाविद्यालयामार्फत मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य शरद चव्हाण यांनी अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग जातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करीता लागणारे आवश्यक कागदपत्र व त्याची पुर्तता कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बार्टीच्या संकेतस्थळाची व ऑनलाईन फार्म भरण्याची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या विविध शंका व अडचणींबाबत निरसन करण्यात आले.
या शिबिरास महाविद्यालयीन ईयत्ता 11 वी व 12 वीचे विज्ञान शाखेतील प्रवेशीत 150 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राचार्य श्री. खुले व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता कार्यालयातील अखिल चांदुरकर यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या