मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- धाराशिव :-दिनांक 22 डिसेंबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विद्युतीकरणाचे काम (५.१५ लक्ष रू.) काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होते.
येथील विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. या रोषणाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य अधिक फुलले आहे. याचा आनंद शहरातील नागरिकांना आता घेता येणार आहे.
तुळजापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन भाजपा नेत्या अर्चना पाटील या विधुतरोषनाई लोकापन सोहळ्यात बोलत होत्या
याप्रसंगी युवा नेते श्री.विनोद (पिटुभैय्या) गंगणे, श्री.सचिन रोचकरी, श्री.बापु कणे, पोलिस निरीक्षक काशीद, श्री.पंडीतराव जगदाळे, श्री.नारायण नन्नवरे, श्री.विजय कंदले, श्री.आनंद कंदले, श्री.विशाल रोचकरी, श्री.अविनाश गंगणे, श्री.शांताराम पेंदे, श्री.औदुंबर कदम, श्री.अमर हंगरगेकर, श्री.किशोर साठे, श्री.माऊली भोसले, श्री.अजित परमेश्वर, श्री.नरेश अमृतराव, श्री.आबासाहेब कापसे, श्री.गुलचंद व्यवहारे, श्री.नागेश नाईक, श्री.शिवाजी बोधले, श्री.सुहास साळुंके, श्री.नानासाहेब डोंगरे, श्री.नितिन भांजी, तुळजापूर येथील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक हजर होते.


0 टिप्पण्या