Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युती संदर्भात चर्चेची आणखी एक फेरी पार

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


मुंबई :- वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात युती संबंधीची आणखी एक सकारात्मक चर्चेची फेरी शिवसेना भवन येथे दिनांक २६ डिसेंबर रोजी पार पडली.   
          
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री.सुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री.अबुल हसन खान यांच्यात तपशीलात चर्चा झाली. 'येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला आपण सोबतीने सामोरे जाण्यासंबधीचे आश्वासक संकेत ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. आम्ही त्याला अधिक तपशीलात बोलून पुढे घेवून जाणार आहोत', असे अबुल हसन खान यांनी सांगितले.
             
यूती संर्दभातील चर्चेची अंतिम फेरी पार पडल्यानंतर लवकरच दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येवून युतीची अधिकृत घोषणा करतील असेही अबुल हसन खान यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या