Ticker

6/recent/ticker-posts

"खेळातून कार्य आणि सेवेची ऊर्जा मिळते.." - जिल्हाधिकारी अमोल येडगे

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

यवतमाळ :- जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२ चे आयोजन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खेळाचे महत्व विशद केले. “रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. महसूल विभागाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या व्यापामुळे खेळासाठी फार वेळ देता येत नसला, तरी कुठेतरी वेळेचं नियोजन करून खेळाकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे” मत अमोल येडगे यांनी स्पर्धेच्या उदघाटनावेळी व्यक्त केले. 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवनकुमार बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, पुसद उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महसूल सेवेतील कर्मचाऱ्यांना २४ तास सेवेसाठी हजर राहावं लाग. कामाचा कधी-कधी प्रचंड ताण येतो. पूर्ण कार्यक्षमतेने आणि ताणविरहित काम करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक सुदृढता आवश्यक असुन त्यासाठी (Physical Fitness) व्यायाम आणि खेळाला पर्याय नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी काम आणि वेळेचे नियोजन करून खेळाकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 

क्रीडा हा प्रकार चर्चेचा नाही तर कृतीचा विषय आहे, प्रशासन स्तरावर देखील ज्याप्रमाणे शासकीय ओळख पत्रावर नाव, मोबाईल क्रमांक, रक्तगट आणि हुद्दा असतो तसंच वजन देखील लिहायला सुरुवात करण्याचा आपण प्रयत्न करू, तसेच वर्षभरात कर्मचारी physical fitness साठी काय करता याबाबत वार्षिक कार्य अहवालात त्याबाबत विचारणा करण्याचा देखील प्रशासनाचा मानस असल्याचे मा. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या