सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
परभणी:- पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर लिंबा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऊस वाहतूक करणार्या ट्रक, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर यांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून रेडियम रिफ्लेक्टर चमकत असते. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी होते. त्याकरिता कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार आर. टी. देशमुख जीजा व कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित भैया देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
दरम्यान, यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, केन मॅनेजर वसंत चरमळ, चीफ इंजिनिअर प्रमोद देशमुख, केन यार्ड सुपरवायझर पांडुरंग जाधव, रिफ्लेक्टर पुरवठादार सुरेश गिराम व ऊसतोड वाहतूक ठेकेदार, कंत्राटदार, ड्रायव्हर आदींची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या