Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा…कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास…

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975

 महाराष्ट्र-कर्नाटक  -: यांच्यातील सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मंत्र्यांनी कर्नाटकात बेळगावी घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असून, त्यांच्या मंत्र्यांना बेळगावला न पाठवण्यास सांगणार आहे. ते म्हणाले, या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. यासोबतच सीमाभागात कडक पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या