Ticker

6/recent/ticker-posts

सिंदेवाही तालुका काँग्रेसच्या वतीने घोडाझरी येथे आयोजित सहकार मेळावा संपन्न ...

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

चंद्रपूर :-काही महिन्यांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील २१ सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. सदर निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला होता. या निवडणुकीत विजयी सेवा सहकारी संचालक मंडळाचा सत्कार करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

तसेच सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला राम राम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर जिल्हा तसेच ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष वेगाने मजबूत होत आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या