Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

हिंगोली: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या