चरुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
जळगाव :- बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने कळवू इच्छितो की , जळगांव जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे प्रकाश गोबरू सोनोने मुख्याध्यापक यांची बहुजन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे असे एका आदेशाद्वारे राज्याचे राज्यध्यक्ष तथा नेते श्री. भास्करराव हिवाळे यांनी जाहीर केले आहे .
प्रकाश गोबरू सोनोने जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ पुढील ३ वर्षाचा राहील तसेच त्यांना जिल्हा कार्यकारणी निवड करण्याचे अधिकार देण्यात आले आहे . त्यांनी जिल्हा कार्यकारणी तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावी.
असे बहुजन कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव जाधव उपाध्यक्ष व अतिरिक्त सचिव संजय एरंडे पुणे, आणि श्रीमती रत्नमाला बागुल महिला प्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
असे साप्ताहिक बहुजन सेवक चे उपसंपादक अशोक जाधव आणि जामनेर तालुका प्रतिनिधी संजय लोखंडे, गोरखनाथ नरवाडे हे कळवितात.


0 टिप्पण्या