Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मावशी भामाबाई आठवले यांचे निधन



रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


 मुंबई :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या मावशी भामाबाई ज्ञानू आठवले यांचे दि. 20 जानेवारी रोजी संगली येथे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा जलदान विधी आज रविवारी दि.22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील राम नगर लुंबिनी बुद्ध विहार येथे बौद्ध पद्धतीने करण्यात आला.यावेळी ना.रामदास आठवले त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि सर्व शोकाकुल आठवले कुटुंब उपस्थित होते. यावेळी रिपाइंचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे; रिपाइं चे राज्य सचिव श्रीकांत भालेराव; योगेश शिलवंत;विनोद जाधव ;आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या