कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा लाखनी - ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे दरमहा येणारे ५ ते ७ हजार रुपये वीजबिल भरण्यास असमर्थ असल्याने महावितरण कडून केव्हाही वीजपुरवठा खंडित केला जातो यावर मात करण्यासाठी सर्वच पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविण्यात याव्या अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे .
ग्रामीण परिसरात अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य विकारांचे आजार होत असत .ग्रामीनाना स्वच्छ व शुद्ध जल पुरवठा व्हावा याकरिता पाणी पुरवठा योजनाना सुरुवात करण्यात आली. सनियंत्रण देखभाल व दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले .यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पण ग्रामपंचायतीचे तोडके उत्पन्नामुळे पाणी पुरवठा, वीजबिल , देखभाल दुरुस्ती व कर्मचारी वेतन देण्यात ग्रामपंचायती सक्षम नाहीत . वेळेत वीजबिल भरणा केला नाही तर महावितरण कडून वीज पुरवठा खंडित केला जातो . त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो .यावर मात करण्यासाठी सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरू कराव्या अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश (हेमंत)कोरे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या