• दिघोरी जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा लाखनी :- महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे द्वारा इयत्ता ५वी च्या विद्यार्थ्यांकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तथा इयत्ता ८वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शाळेतून किमान ५० टक्के विद्यार्थी या परीक्षेला बसण्याची सक्ती करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र व्हावे. या करिता मुख्याध्यापक प्रमोद हटेवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक शिक्षिका ज्योती राऊत, ललिता तागडे, गीता बोरकर, मीरा वंजारी अतिरिक्त वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिघोरी येथे इयत्ता १ ते ७ असून ९६ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. या करिता जिल्हा परिषदेने मुख्याध्यापकासह ५ शिक्षक नियुक्त केलेले आहेत. शाळेची सुसज्ज इमारत, अधयावत संगणक कक्षासह सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. सध्या स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांत बालपणापासून स्पर्धा परीक्षेबाबत आवड निर्माण व्हावी. या करिता प्राथमिक स्तरावर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेद्वारा शिष्यवृत्ती परीक्षा याशिवाय नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात येऊन पूर्व प्राथमिक स्तरावर पाचशे रुपये व उच्च प्राथमिक स्तरावर एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम भाषा(मराठी) व गणित १५० आणि तृतीय भाषा(इंग्रजी) व बुद्धिमत्ता चाचणी १५० अशा ३०० गुणांचे २ पेपर असतात. आपले शाळेतील सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी पास व्हावे. या करिता मुख्याध्यापक प्रमोद हटेवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक शिक्षिका ज्योती राऊत, ललिता तागडे, गीता बोरकर, मीरा वंजारी शैक्षणिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शिष्यवृत्ती परीक्षेचे अतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्यांकडून आवश्यक तो अभ्यास करवून घेत आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होतील. असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
0 टिप्पण्या