Ticker

6/recent/ticker-posts

त्या पंधरा वर्षीय बालकाचा अद्यापही सुगावा नाही नातेवाईक चिंतातुर, शंकाकुशंकाना फुटले पेव

 कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

 पोलिसांकडून शोध घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न


लाखनी :- पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील इयत्ता ९वी मध्ये शिकणारा उमेश नंदरधने हा वाकल येथून २५ जानेवारी पासून बेपत्ता आहे. पोलिस शोध घेत असले तरी १० दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा सुगावा लागला नसल्यामुळे काही बरे वाईट तर झाले नाही ना. अशा शंकेने कुटुंबीय चिंतातुर आहेत. पोलिसांकडून शोध घेण्यासंबंधाने सर्व पोलिस ठाण्यांना पासपोर्ट साइज फोटोसह माहिती पाठविण्यात आली आहे. तथा अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           उमेश सुकराम नंदरधने(१५) जिल्हा परिषद कनिष्ठ कला महाविद्यालय पालांदूर चा इयत्ता ९वी चा विद्यार्थी असून तो मागील ६ महिन्यापासून गायत्री भेदे, पालांदूर ह्या बहिणीचे घरी राहून शिक्षण घेतो. २४ जानेवारी रोजी तो नेहमी प्रमाणे शाळेतून परत आला. जेवण करून बस स्टॉप वरून फिरून येतो म्हणून निघून गेला. दुसरे दिवशी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास त्याचे आजीचे घरी मरेगाव येथे जेवण करून त्याचे जवळ असलेल्या हिरव्या रंगाच्या जुनी लेडीज सायकल घेऊन पालांदूर ला जातो म्हणून मरेगाव वरून निघाला. पण घरी परतला नाही. त्याचा वर्ण सावळा, बांधा सडपातळ, उंची ४ फूट ५ इंच, अंगात लाल रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा बरमोळा घातला आहे. गायत्री भेदे(२३) पालांदूर यांचे फिर्यादी वरून पालांदुर पोलिसांनी अपराध क्रमांक ११/२०२३ नुसार अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलाची सर्व पोलिस ठाण्यांना माहिती पाठविली आहे. वरील वर्णनाचा मुलगा कुठे आढळल्यास पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे ९४२३६६७६९७ अथवा तपास अधिकारी सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट ९९२३७७३९८८ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेश बेपत्ता होऊन १० दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा सुगावा लागला नसल्याने कुटुंबीय चिंतातुर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या