लिंगोजी कदम:- जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नांदेड संपर्क:-९६८९८२११३२
हिमायतनगर -: प्रजासत्ताक दिनानिमित्त करंजी जि प शाळेत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते बंजारा गीते लावणी नृत्य तेलगू बंगाली शिव गीते बालगीते अशा गीतांवर बहारदार नृत्य सादर केले तर सध्या समाजात चालू असलेल्या संक्रातीनिमित्त वाण घेण्याचा कार्यक्रमाचे नाटक स्वरूपात सादरीकरण केले. हा कार्यक्रम दिनांक १ .२ .२०२३ रोजी बुधवारी सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद शाळा करंजी येथे महादेव मंदिराच्या समोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून करंजी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ वनिता बालाजी पुट्टेवार होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री गटशिक्षणाधिकारी शिवानंद नागभूषण शिवाचार्य व श्री गणेश कोकुलवार केंद्रप्रमुख सरसम हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधरराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक गजाननराव सूर्यवंशी व डॉक्टर रामदास परभणीकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव पाटील जाधव व माजी सभापती दत्तराव पाटील करंजीकर संचालक ना सर पठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरिफ पठाण गजानन गाडेकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर सविता भुरे मॅडम व आबादीचे मुख्याध्यापक कोंडेकर सर गाडेकर सर व करंजी गावातील महिला युवक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राठोड सर कोंडेकर सर सुनिता भुरे मॅडम गाडेकर सर दोन्ही शालेय समितीचे अध्यक्ष यांनी परिश्रम घेतली सूत्रसंचालन परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राठोड सर यांनी मानले.
0 टिप्पण्या