कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा लाखनी :- शंकरपटात बैलजोड्याचे शर्यतीत बैलांना निर्दयतेने वागणूक दिली जाते. या कारणावरून न्यायालयाने शंकरपटावर बंदी आणली होती. शंकरपट प्रेमींना न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यात शंकरपटात बैलांना क्रूरतेची वागणूक दिली जात नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून देण्यात आल्याने काही अटी व शर्तीवर बंदी उठविण्यात शिथिल करण्यात आली. त्या अटी व शर्तींचे पट समितीसह बैलजोडी मालकांनी काटेकोरपणे पालन करावे. असे नीलागोंदी येथील शंकरपटाचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सांगितले.
तालुक्याचे शेवटचे टोकावर साकोली तालुक्याचे सीमेवर असलेल्या वनव्याप्त दुर्गम गाव नीलागोंदी येथे शुक्रवारी(ता.२ व ३) शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला पटले, प्रमुख अतिथी नगरसेवक राजेश(बबलू) निंबेकर, सामाजिक कार्यकर्ता मोहसिन आकबानी, मोरगाव चे उपसरपंच मनोहर पटले, गूढरी चे माजी सरपंच पवन शेंडे, सामाजिक कार्यकर्ता अशोक पटले, हेमंत पब्बेवार, सेवानिवृत्त वनपाल रमेश वंजारी, तमुस अध्यक्ष योगराज हटवार, सरपंच वर्षा महावीर वंजारी, उपसरपंच महेश हटवार, ग्रामपंचायत सदस्य छत्रपती हटवार, दिनेश वंजारी, सदस्या विद्या हटवार, स्मिता बनसोड, प्रियती वरठे, सुषमा शेंडे, पत्रकार खुशाल भुरे आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींचे प्रमुख उपस्थितीत फित कापून विधिवत उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी न्यायालयाचे मार्गदर्शक सूचनांनुसार शंकरपटात बैलांच्या शर्यती लावण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सरपंच वर्षा हटवार, संचालन व आभार सामाजिक कार्यकर्ता महेश हटवार यांनी मानले. प्रथम बैलजोडी हाकण्याचा मान डुडेश्वर हटवार व विक्रम वंजारी ह्या बैलजोडी मालकांना मिळाला.
0 टिप्पण्या