अदाणीच्या कंपन्यांची ईडी मार्फत चौकशी कां नाही
भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847
भडारा :- भाजप विरोधी राजकीय नेत्यावर उठसुठ ईडीची चौकशी लावणाऱ्या सरकारने आता अडाणी च्या चौकशी साठी शेपूट कां दाबले आहे. संसदेत बहुमताच्या जोरावर विरोधकांची चौकशीची मागणी कां फेटाळण्यात आली. कर नही तो डर कसा असे म्हणणारे आता कां घाबरत आहेत. एल.आय.सी. ला आणि एस. बी.आय. बँकेला अडाणी समूहात कोणी पैसे गुंतवायला लावले. या संस्थांच्या अध्यक्षांची, कार्यकारिणी सदस्यांची चौकशी करण्यास एवढे घाबरण्याचे कारण काय.
अडाणी कोणाचे मित्र आहेत व ते एवढ्या लवकर 7 वर्षात कसे टॉप टेन मध्ये पहिल्या नंबरवर आले. त्यांच्या कंपनीच्या शेअर मध्ये गोलमाल आहे, हे विदेशी पत्रकारांच्या लक्षात आले, आपल्या देशाच्या तपास संस्था व पत्रकारांच्या लक्षात कसे आले नाही. शेअर गडगडले याची छोटीसी बातमीच का दाखवण्यात आली. हा स्कॉम छोटा आहे का.
सामान्य माणसाला शेअरशी काही देणे घेणे नाही, मात्र एल.आय.सी. व बॅंकाशी देणे व घेणे दोन्ही आहे. कारण येथे त्यांचा घामाचा पैसा ठेवला आहे.
म्हणून या घोटाळ्याची चौकशी तर झालीच पाहिजे. कोण या मागे आहे, ते समोर यायलाच हवे.
बुडालेला हा तुमचा घामाचा पैसा आहे, म्हणून याची चौकशी व्हायलाच पाहीजे.
0 टिप्पण्या