चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-महिला पतंजली व मा शारदा योग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय योग शिबिराचे हवन यज्ञाद्वारे समापन करण्यात आले .सौ ज्योतीताई पटले व कु. स्नेहल तिडके यांनी हवन करून साधकांना पतंजली हवन सामग्री विषयी माहिती दिली. हर्षा बावनकर यानी शांति आणि आरोग्याची वाट म्हणजे योगा असे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ग्रीन हेरिटेज चे संस्थापक/ अध्यक्ष सईद शेख यांनी पर्यावरण रक्षणासाठी महिला मोठे काम करू शकतात,करिता योगा बरोबरच महिलांनी पर्यावरणाचे रक्षणासाठी ही पुढे यावे आणि येणाऱ्या पर्यावरण दिनावर प्रत्येक महिलांनी आपल्या निवासस्थानी एक झाड अवश्य लावावे असे आहवान केले.वृक्ष रोपे देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिबिराचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन महिला जिल्हा प्रभारी सौ वैशालीताई गिऱ्हेपुंजे, सौ हर्षाताई बावनकर आणि माॅ शारदा योग वर्गातील साधिका यांनी केले.
शिबिराला राज्य कार्यकारणी सदस्य सौ. कांचनताईं ठाकरे, ज्योतीताई पटले ,जयश्रीताई भुरे, स्नेहल तिडके ई .उपस्थित होत्या.
योगसत्र घेणाऱ्या योगशिक्षकेचा भेटवस्तू आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे तीनही दिवस उपस्थित असलेल्या लहान साधकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वैशालीताई यांनी केले.
0 टिप्पण्या