सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- 03/02/2023 रोजी जामखेड येथे अहमदनगर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्यां तीन अरोपीन वर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. तसेच जामखेड येथे 103084 रु किं. चे हिरा पान मसाला, राजनिवास, हिरा गुटखा याप्रकारचे सुंगधी गुटखा आढळून आल्याने जामखेड येथील सर्वात मोठे व्यापारी विनोद तोंडे रा. शिक्षक काँलेनी येथे गेले असता त्याच्या राहत्या घरी पोलीसांनी कारवाई केली असता त्या ठिकाणा हुन मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. तसेच खर्डा चौक येथे स्टार गोळी सेंटर व जनता गोळी सेंटर या ठिकाणीही पोलीसांनी दोन अरोपींना ताब्यात घेण्यात आले. पेट्रोलिंग करीत असताना अरोपी आढळून आले.
महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुंगधी तंबाखू, सुंगधी सुपारी मानवी अरोग्यास हानिकारक आहे. गुटखानवर उत्पादन अन्नपदार्थान वर शासनाने बंदी घातलेली आसताना देखील गुटखा मोठ्या प्रमाणावर विक्री करताना दिसुन येत आहे.
सदर ची कारवाई अहमदनगर येथील पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पथकातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलिस नाईक शंकर चौधरी, पो. ना. संतोष लोडे, पो. ना. संदीप चव्हाण, पो. ना. राहुल सोळंके, पो. ना कमलेश पाथरुड यांनी हि कारवाई केली.
चौकट -
शहर व तालुक्यात अवैध धंद्याने जोर धरला असून अवैध धंद्यावर अवैध धंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सध्या स्थितीत दिसून येत आहे तर स्थानिक गुन्हे शाखेला अहमदनगर येथुन येऊन जामखेड मध्ये कारवाई करावी लागत आहे.
0 टिप्पण्या