कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा लाखनी - जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी जिल्ह्यातील १९ पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांचे प्रशासकीय स्थानांतरण केले असून आदेशित केलेल्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत .त्यात पोलिस निरीक्षक राजेश थोरात कारधा यांची साकोली येथे बदली करण्यात आली असून कारधा पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार ठेवण्यात आला आहे . पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम वरठी येथून वाहतूक शाखा भंडारा , पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे मोहाडी वरून सायबर सेल मुख्यालय भंडारा आणि स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे , पोलिस निरीक्षक डी .झेड. गढरे पवनी येथून मानवी संसाधन शाखा पोलिस मुख्यालय , पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर साकोलीवरून जिविशा पोलिस मुख्यालय , पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार जीविशा येथून पोलिस ठाणे मोहाडी , पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे अर्ज शाखा व दोषसिद्धी सेल अतिरिक्त कार्यभार येथून पोलिस ठाणे पवनी , पोलिस निरीक्षक सुनील उईके नक्षल सेलमधून सुरक्षा शाखा , पोलिस निरीक्षक मनोज वाडीवें भरोसा सेल मधून नक्षल सेल .
सहायक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी लाखनी वरून पोलिस ठाणे सिहोरा, सपोनी प्रशांत मिसळे कारधा वरून पोलिस ठाणे अड्याळ, एपीआय सुबोध वंजारी वरठी येथून सायबर सेल, सपोनी एन .एच .तुरकुंडे सिहोरा वरून स्थानिक गुन्हे शाखा , एपीआय एस.पी.बोरकुटे अड्याळ वरून पोलिस ठाणे जवाहरनगर , सपोनी सौरभ घरडे स्थानिक गुन्हे शाखा येथून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक , सपोनी नितेश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक ऐवजी स्थानिक गुन्हे शाखा , सपोनी सुरेश मट्टमी नियंत्रण कक्ष येथून दोषसिद्धी सेल आणि अर्ज शाखेचा अतिरिक्त कार्यभार, सपोनी अभिजीत पाटील सायबर सेल मधून पोलिस ठाणे वरठी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.ए.बैसाने जवाहरनगर हे प्रतिक्षाधिन आहेत .याप्रमाणे जिल्ह्यातील १९ पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कारणास्तव स्थानांतरण करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या