आपलेच गहू आणि आपल्याला जेवू!
जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक ते पंचमुखी हनुमान कडे जाणारा , ईच्छा देवी चौकात हायवेला जोडणारा हा रस्ता, मुख्य रहदारी चा रस्ता आहे.येथे छाबडा यांच्या दुकानाजवळ उघडी गटार,त्यात तुंबलेले ,कुजलेले पाणी,सडलेले अन्न दुर्गंधी देते.रस्त्याच्या मध्यवर्ती गटार चार फुट तुटलेली आहे.पुढे तर नागडी उघडी आहे.तरीही कोणत्याही अभियंत्यांना किंवा नगरसेवकांना यांची लाज वाटत नाही.इतके निगरगठ्ठ आणि निठल्ले हे महानगरपालिकेचे लोक.कालच तिकडे नरेंद्र मोदींनी दिल्लीत व्हेस्टाचे उद्घाटन केले. इकडे जळगाव ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत सुद्धा या विष्ठेचे उद्घाटन झाले पाहिजे होते. आमदार येतात, मंत्री येतात आणि जळगाव कसे लुटायचे?याचे नियोजन करून जातात. त्यापैकी एकालाही सुबुद्धी आली नसेल का?एकालाही हे दिसले नसेल का? आमदार मामा किंवा मंत्री महाजन या रस्त्याने कधी गेलेच नसतील का?
मंत्रालयात पांच टक्के कमिशन देऊन निधी आणणे आणि रस्ता बनवतांना वीस टक्के कमिशन काढून घेणे,इतकाच उद्योग जळगाव चे नगरसेवक करीत आहेत.याच टक्केवारी मधून मतदारांना पांचशे रूपये वाटणार आहेत.आपलेच गहू आणि आपल्याला जेवू!
मतदारांनो,हे टक्केवारीतून जन्माला आलेले नगरसेवक आणि आमदार आपल्याच करातून जमा झालेल्या निधीचे तीन तेरा करीत आहेत.रस्ता व गटारीतून कमीशन काढून अर्धवट रस्ते व कंडेम गटारी बनवत आहेत.अशा टक्क्यांना ,टप्पोरींना निवडून देणे म्हणजे जळगाव लुटण्याचा परवाना देणे.आता मामा आणि महाजन यांच्या पैशांना बळी पडू नका.कर्नाटकात जसे महिलांनी साड्या व पुरूषांनी कोंबड्या उमेदवारांच्या अंगावर फेकल्या तसेच आता जळगाव ला यांची बाटली व चखणा यांच्या अंगावर भिरकावून देण्याची गरज आहे.ही चोर मंडळी आता सांस्कृतिक कार्यक्रमांना देणगी देऊन कलाकार व पत्रकारांकडून स्वताचे उदात्तीकरण करून घेत आहेत.कालच जळगाव येथे छत्रपती संभाजी राजेंच्या सोबत स्टेजवर लुटारू नगरसेवक व आमदारांना पाहिले.आता चोरांचे,लुटारूंचे अनुनय आणि सविनय करणे बंद केले पाहिजे.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या