Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - २८ मे
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ७ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :  ज्येष्ठ
पक्ष :   शुक्ल             
‌तिथी :  अष्टमी (०९.५०) ~ नवमी                              
वार :    रविवार
नक्षत्र :  पूर्वा         
राशी :   सिंह 

*दुर्गाष्टमी* 

*स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंती* (दिनांकानुसार)

*ब्रह्मचैतन्य श्री. तुकामाई महाराज पुण्यतिथी,* येहळेगाव, हिंगोली. 

*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* 
(२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६) 
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी आचार्य अत्रे यांनी दिली.

१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१५८८: एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
१८३० : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यातूनच या जमातींचा वंश विच्छेद झाला.
१८९२: जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
१९०५: रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई – जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
१९१८: अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
१९३६: ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७: फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी. मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९५९: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दोन अमेरिकन माकडांना अंतराळ यात्रा घडवून आणली.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
१९७०: ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे औपचारिकपणे विभाजन करण्यात आले.
१९९६ : भारताचे पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
१९९८ : भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच अणुबॉम्ब उडवले.
१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
२००८: नेपाळ मध्ये पुरातन काळापासून चालत आलेल्या  राजेशाही परंपरेचा शेवट झाला.

जन्मदिवस
१८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
१९०३ : शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
१९०७: नानासाहेब पुरोहित, स्वातंत्र्य सेनानी, रायगड सैनिकी शाळेचे संस्थापक.
१९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग 
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर 
१९२३ : एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री.
१९४६: प्रख्यात भारतीय मल्याळम आणि इंग्रजी भाषिक कवी आणि समीक्षक तसंच, मल्याळम् भाषेतील आधुनिक काव्याचे प्रणेते, द्वैभाषिक साहित्य समीक्षक, नाटककार, संपादक, स्तंभलेखक आणि अनुवादक,  भारतीय साहित्य जर्नलचे माजी संपादक आणि साहित्य अकादमीचे माजी सचिव के. सच्चिदानंदन. 

मृत्यूदिन
१९६१ : परशुराम कृष्णाजी गोडे, प्राच्यविद्या  संशोधक .
१९७९: पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिकित्सक (डॉक्टर), शिक्षणतज्ज्ञ, बँकर आणि समाजसेवक डॉ. टी.ए. तथा टोन्से माधव अनंत पै. 
१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे 

*।। दास-वाणी ।।* 

ब्रह्म असतचि असे । 
माया निरसताच निरसे । 
ब्रह्मास कल्पांत नसे । 
मायेसि आहे  ।। 
माया कठिण ब्रह्म कोमल । 
माया अल्प ब्रह्म विशाळ । 
माया नासे सर्वकाळ । 
ब्रह्मचि असे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०५/१९-२० 

परब्रह्म काल होते, आज आहे, उद्याही असेलच. याचा अर्थ ते नित्य आहेच आहे.
माया मिथ्या आहे. मायेचे निरसन करता येते. कल्पांताचे वेळी तर सर्व मायिक सृष्टी नष्ट होते. परब्रह्माला कल्पांत नाही.

मायिक सृष्टी कठिण म्हणजे जड आहे.
परब्रह्म मात्र कोमल म्हणजे सूक्ष्म आहे.
मायिक पदार्थांना रंग रूप नाम आकार असल्याने ते सीमित असतात.
परब्रह्म निर्गुण निराकार आणि सर्वव्यापी आहे, म्हणून ते विशाल आहे.
मायेला नाश आहे तर परब्रह्म अविनाशी आहे.

मायाब्रह्मनिरूपणनाम समास.

🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या