प्रतिनिधी चित्रा न्युज
नाशिक - वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक महानगरच्यावतीने परमेश्वर रणशूर व गौतम हराळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक महानगराच्यावतीने पोलिस आयुक्त शिंदे सर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपी जगदीश गायकवाड व त्याची टोळीला अटक करण्याची मागणी करन्यात आली.
हा हल्ला परमेश्वर रणशूरवर नसून हा आंबेडकर भवनवरील हल्ला आहे, असे समजून गुन्हेगारास लवकरात लवकर अटक करण्यात यावी. असे न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देतांना महानगर प्रमुख रवि अण्णा पगारे, महानगर महासचिव दिपक पगारे, उपाध्यक्ष अमोल चंद्रमोरे, साहेबराव शिंदे, सनी जाधव,ज्ञानेश्वर वाहुळे, मंगेश पवार आदि. पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या