Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर येथील शिबिर आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत ठरलेल्या वेळेतंच होणार - ईश्वर बाळबुधे


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल द्वारा सक्षम वक्ते, संघटक, प्रचारक व कार्यकर्ते तयार  करण्याच्या हेतूने नागपूर येथे दोन दिवसीय *निवासी शिबीर* शनिवार दि. ०३ जून व रविवार दि. ४ जून २०२३ रोजी आयोजित केले आहे.
या शिबिराच्या समारोपाला देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहे.
प्रमुख उपस्थितीखासदार मा. प्रफुल्ल पटेल साहेब, विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, ओबीसी नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी मंत्री एकनाथ खडसे साहेब, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरासाठी सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शिबिरार्थीची तसेच ओबीसीच्या विवीध घटकातील समाजसेवकांची प्रमुख नावे मोबाईल नंबर सह पुढील तारीख १७ मे २०२३ पर्यंत ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश
(मो. क्र. 9822225581) व राज्य सोशल मीडिया प्रभारी अतुल राऊत (मो. क्र. 9822042484) यांच्याकडे द्यावीत.
शिबीराचे स्थळ - महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशिमबाग, नागपूर
वेळ - शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी 
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
रविवार दि. ४ जून २०२३ रोजी
 सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ...

शिबिरार्थीसाठी चहा, नाष्टा, भोजनाची तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आपण त्वरीत आपले येण्या - जाण्याचे रेल्वे अथवा इतर साधनाचे आरक्षण करून घ्यावे

आपल्या जिल्ह्यातून येणाऱ्या शिबिरार्थीची यादी पाठवा जेणेकरून निवास तसेच भोजनाची व्यवस्था करणे सोईचे होइल

आयोजक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या