जळगावला राजकीय गुन्हेगारीचा विळखा!
सुरेशदादा जैन हे शाकाहारी व्यक्ती.मांस, मद्य तर जन्मापासून वर्ज्य असते.त्यामागे हेतू असतो.सात्विक आहार. सात्विक विचार.सात्विक विहार.पण राजकारणात उतरले आणि नंतरच्या काळात, कोणत्याही कारणाने असो पण त्यांनी गुन्हेगार लोकांना सोबत घेतले.ते स्वतः जैन असूनही जैनासारखे राहू शकले नाहीत.परिणाम जरी मान्य नसले तरीही ते नाकारता येत नाहीत.घडले ते घडले.दिसले
,पाहिले,वाचले,अनुभवले.दांदांनी जे नांव कमवले होते ते गमवले.मानो या न मानो,हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक, नैतिक पातळीवर विचार करून आकलन होते.बुद्धी,निती आणि विचारांची जबरदस्ती करता येत नाही.नाकारून आनंद मानणे किंवा स्विकारून परिमार्जन करणे,हे व्यक्तीसापेक्ष असते.
नंतर जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांची एकहाती सत्ता आली.पण त्यांनासुद्धा जास्त वेळ उपभोगता आली नाही.ते दोष इतरांना देतात,कधी फडणवीस,कधी महाजन.याच्याने वास्तव बदलत नाही.त्यांचे सोबत असलेली चुकीच्या माणसांनी, गुन्हेगार माणसांनी त्यांना या स्थितीपर्यंत पोहचवले.हे त्यांच्या लक्षात आलेच नाही.येणारही नाही.पण मी मात्र समक्ष भेटून सांगितले कि,दोन चार सज्जन माणसे सोबत ठेवा.जे तुम्हाला बोलू शकतात,टोकू शकतात,अडवू शकतात,थांबवू शकतात.पण ते म्हणाले,अशी माणसे ओळखावी कशी?मी म्हणतो,हे ओळखण्यासाठी तितकी सत असत बुद्धी असावी लागते.स्वार्थाला मर्यादा घालाव्या लागतात.त्यांना जमले नाही.
आता जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांचा धुमाकूळ चालू आहे.यांना वाटते, आम्ही काहीही केले तरी आमचे कोणीही बिघडवून घेणार नाही.म्हणून ते सैराट आणि सुसाट वागत आहेत.बेलगाम झाले आहेत.पण पापाचा घडा भरतो तेंव्हा एकनाथ शिंदे काय ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकणार नाही.पाण टपरी चालवणाऱ्या माणसाने संधी मिळाली तर किती लोभ धरावा?याचे तारतम्य ते बाळगत नाहीत.कदाचित तितकी बौद्धिक, नैतिक क्षमता त्यांची नाही.भगवा सदरा घातला, लांबलचक टिळा लावला म्हणून लोक साधू समजतात ,असा त्यांचा भ्रम आहे .पण जसे चांगल्या कामाचे मोजमाप होते, बैनर लागते,तसेच पापाचे ही मोजमाप होते.पण त्याचे बैनर लागत नाही.याची झलक,टिझर जळगाव शहरातील प्रभाग १६मधे पाहायला मिळाली.
गिरीश महाजन चांगले कुटुंबातील आहेत.वडिल शिक्षक.पण यांनी आगळा वेगळा मार्ग अनुसरला.आरोग्य सेवेच्या माध्यमातून आमदार झाले, मंत्री झाले.आरोग्यमंत्री सुद्धा झाले.जळगांवला आरोग्य शिबीर घेतले.तेंव्हा दोन सराईत माणसांच्या हातून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करून घेतले.ही त्यांची पारखी नजर.गुंड, गुन्हेगार ताबडतोब ओळखतात आणि कडेवर, खांद्यावर घेतात.हाच फंडा त्यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत वापरला.नको ती घाणेरडी माणसे जमवली.उमेदवारी दिली.निवडून आणली.माकडांच्या हाती कोलीत दिले.पुढे तर याच माकडांनी इकडून तिकडे उड्या मारल्या.जळगावचे शांघाय , सिंगापूर बनवण्याचे आश्वासन दिले होते पण मागील पांच वर्षात जळगाव शहराचे लाहोर बनवले.शहर राहाण्याच्या लायकीचे ठेवले नाही.अनेक सभ्य, अभिजात जन जळगाव सोडून गेले.तरूण पिढी दारू पिऊन रस्त्यावरून नाचू लागली.यांनाही नाचण्याचा मोह आवरला जात नाही.श्रीकृष्णाच्या नातवांनी सुद्धा असेच केले होते.महाजन यांनी नुतन मराठा सारख्या संस्थांमधे कोणत्या कारणाने हात घातला कि पाय घातला,हे प्रत्येक माणूस वेगवेगळे उत्तर देईल.पण परिणाम मात्र वाईट आहे.ज्या संस्था अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे काम करीत होत्या त्याच संस्था आता लालसेतून गुन्हेगारीकडे नेत आहेत.
मागील पांच वर्षात जळगाव शहर लांचखोरी, टक्केवारी, कमीशनखोरी च्या खाईत बुडाले तरीही महाजन यांना चांगली उपरती आलीच नाही.हे आपल्या कलाकुसरीचे परिणाम आहेत,ते मान्य करणारच नाहीत.पण लोकांना आकलन झाले आहे.दारू वाले, डान्सबार वाले,रेतीवाले,चाकू सुरी वाले अशी फौज जमा करून ते पुन्हा जळगाव शहरात हैदोस घालणार आहेत.कालच त्यांनी या कामात प्रविण लोकांची बैठक घेऊन पुढची मोहिम आखली.ऐनकेण प्रकारे शिकंदर सारखा विजय निवडणुकीत मिळवला असला तरी त्याचा शेवट मात्र विनाशकारी होत आहे.झाला आहे.
मी पाहातो,बोलतो,लिहीतो.नव्हे त्या त्या माणसाला समक्ष भेटून सांगतो.कि हे चुकीचे चालले आहे.सावरा आणि आवरा.तुम्ही नाही सावरले किंवा नाही आवरले तर आता जळगाव चे लोक तुम्हाला सावरणार आहेत, आवरणार आहेत.सिनेमात ,नाटकात खलनायक संपतो, तेंव्हा द एण्ड होतो.तसेच राजकारणात सुद्धा द एण्ड होत असतो.आता जळगाव शहर लांचखोरी, टक्केवारी, कमीशनखोरी, गुन्हेगारी च्या परम बिंदूवर पोहचले आहे.हे कोणी पवार,कोणी ठाकरे, कोणी फडणवीस,कोणी शिंदे सावरू शकणार नाहीत.ते काम आपण जळगाव चे लोक करणार आहोत.लोकशाही च्या निवडणुक माध्यमातून.महाजन यांचा पैसा, ईव्हीएम ,दारू ,मटण आता प्रभावहीन ठरवणार आहोत.
भाजप मधील एकाही सज्जन पदाधिकाऱ्यांनी मा.नरेंद्र मोदींना सांगितले नाही का?कि ,आमचा आमदार दारू विक्रेता आहे .आमचे नगरसेवक सराईत गुन्हेगार आहेत.भरत अमळकर,डॉ.राधेशाम चौधरी,दिपक सुर्यवंशी यांनी तरी!
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या