Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌



💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ३० मे
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ९ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :  ज्येष्ठ
पक्ष :   शुक्ल             
‌तिथी :  दशमी (१३.००) ~ एकादशी                                 
वार :    मंगळवार
नक्षत्र :  हस्त         
राशी :   कन्या 

गंगा दशमी 
गंगा दशहरा समाप्ती 
सेतुबंध रामेश्वर प्रतिष्ठापना दिन
महर्षि याज्ञवल्क्य जयंती 

*गोवा राज्य दिन*

१४३१: फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड.
१४९८: इटालियन सागरी खलाशी कोलंबस आपल्या सहा जहाजांसोबत अमेरिकेच्या प्रवासाला निघाले.
१८६६: मुस्लीम धर्मीय विद्वान मुहम्मद क़ासिम नानोत्वी यांनी उत्तरप्रदेश मधील देवबंद या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मदरशाची स्थापना केली.
१९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
१९४२: दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीच्या कोलोन शहरावर तुफानी बॉंबहल्ला केला.
१९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
१९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.
१९८७ : गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला. गोव्याला भारतातील २५ वे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. ३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
१९९८: अफगाणिस्तानात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.
२०१२: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळ पटू होण्याचा मान पटकावला.

जन्मदिवस 
१८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर
१९०६: प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि कथा लेखक पंडित मुखराम शर्मा
१९१६- दीनानाथ दलाल, अत्यंत लोकप्रिय, प्रतिभावंत चित्रकार. दीनानाथ दलाल हे वाङ्‍मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक होते परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले.
१९४०: जगमोहन दालमिया, भारतीय उद्योजक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसंच बंगाल क्रिकेट असोसिएशन चे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष.
१९५०- परेश रावल, अभिनेते व राजकारणी 
१९५२: भारतीय औषध शास्त्रज्ञ, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक आणि ज्योतिषशास्त्र सल्लागार विद्याधर ओक

मृत्यूदिन 
१४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या केवळ १९ वर्षाच्या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या नावानेही ओळखली जाते. 
१६०६: शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव
१७७८: व्हाॕल्तेअर, फ्रेंच तत्वज्ञ.
१९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक (प्रजादिपक) ऊर्फ राम (सातवा) 
१९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर 
१९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी.  भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी तसंच, लाला लाजपत राय यांच्यासमवेत ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी.
१९६८:चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर 
१९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. 
१९८९: शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज
२०१३: सर्वोत्कृष्ट बंगाली भाषिक चित्रपटा करिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि गीतकार ऋतुपर्णो घोष

*।। दास-वाणी ।।* 

सकळ मिथ्या होऊन जातें । 
हे रामभजनें कळों येतें । 
दृश्य ज्ञानियांचेनि मतें । 
स्वप्न जैसें  ।। 

मिथ्या स्वप्न विवंचना । 
तैसी सृष्टीची रचना । 
दृश्य मिथ्या साधूजना । 
कळों आलें  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध  : ०६/०७/४३-४४ 

निर्गुण उपासनाच जर अंती मोक्षदायक, तर सगुण भजनाचे काय प्रयोजन? हे दृश्य जगत सत्य भासते परंतु ते सत्य नसते. सत्याचा भास याला म्हणायचे मिथ्या. सगुणरूपाच्या अखंड एकाग्र भजनातूनच दृश्य जगताची नश्वरता समजते. त्याविषयीची आसक्ती कमी होते. हळूहळू मन निर्गुणाकडे खेचले जाते.
ब्रह्मज्ञानी विभूती दृश्य जगताला स्वप्नवत मानतात.

स्वप्नातील विवंचना स्वप्नामधे जरी खऱ्याखुऱ्या भासल्या तरी जागृती आल्यावर त्या मिथ्या ठरतात.
त्याचप्रमाणे सृष्टीची रचना ही सामान्य जनांना सत्य भासली तरी तत्वत: ती स्वप्नवत मिथ्याच आहे या बद्दल जे नि:संदेह असतात ते साधू. तेच संत. 

सगुणभजननाम समास.

🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या