भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि एआयडीपी उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्राम विकासातून लोककल्याण संकल्पनेवर आधारित विविध योजना आणि उपक्रम राबवित ग्रामोन्नती साधण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. दिव्यांगानाही स्वबळावर उभे राहता यावे यासाठी साहित्य वाटपाची योजना तेवढीच महत्त्वाकांक्षी असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार डॉ.हेमकृष्णजी कापगते , बाळाभाऊ काशिवार, जेष्ठ नेत्या सौ. रेखाताई भाजीपाले, तालुका अध्यक्ष लखनजी बर्वे, पं.स. सभापती गणेशजी आदे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरीताई नेवारे, दीपलताताई समरीत, वनीताताई डोये, लायकरामजी भेंडारकर, माजी सभापती उषाताई डोंगरवार, माजी नगराध्यक्षा धनवंताताई राऊत, पवनजी शेंडे, तालुका महामंत्री प्रदीपजी गोमासे, उपसभापती सरिताताई करंजेकर, कृष्णाजी कोमाडवार, पंचायत समिती सदस्य सुशिलजी गणतीर, तसेच सर्वविभागाचे कर्मचारी तथा दिव्यांगबांधव उपस्थित होते.


0 टिप्पण्या