Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अति दुर्गम नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांकरीता " पोलीस दादालोरा खिडकी " योजनेच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन





देवेंद्र दमाहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 
मो. न:-8010710919

 गोंदिया : मा.श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे संकल्प नेतून व श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया. कॅम्प देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलिस दल आणि जि.एस.एफ. (स्किल इंडीया) रिक्रूटमेंट ओफिसर ग्रेडिएंटस ट्रेनिंग अकैडमी हैदराबाद तेलंगाना यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांकरीता रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांना नक्षल चळवळी पासुन दुर ठेवुन त्यांच्या मनात नक्षल विरोधी जनमत तयार व्हावे. नक्षल विचारसरणीकडे बेरोजगार युवक आकर्षीत होणार नाहीत आणि पोलीस व जनता यांचे सबंध सुदृढ होवून बेरोजगार युवकांना रोजगाराची कायमस्वरुपी संधी उपलब्ध व्हावी या करीता "पोलीस दादा लोरा खिडकी "योजने च्या माध्यमातून सुरक्षा कार्याकरीता सुरक्षा गार्ड  म्हणून गोंदिया जिल्हया तील पोलीस ठाणे सालेकसा, देवरी, चिचगड, नवेगावबांध, केशोरी, डुग्गीपार अश्या एकुण 06 नक्षलग्रस्त पोलीस ठाणे स्तरावर दिनांक 22/05 /2023  ते  27/05/ 2023  रोजी दरम्यान सुरक्षा गार्ड रोजगार मेळाव्याचे आयो जन करण्यात आले होते.
 वरील प्रमाणे नमूद पोलीस ठाणे स्थरावर घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये अतिदुर्गम नक्षलग्रस्त परीसरातील एकुण 250 युवकांनी सहभाग नोंदविला असून रोजगार मेळाव्यात सहभा गी युवकांची शारिरीक चाचणी घेण्यात आली त्यापैकी 70 पात्र युवकां ची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रोजगार मेळाव्यात निवड करण्यात आलेल्या युवकांना रिक्रूट मेन्ट ऑफिसर ग्रेडिएंट स ट्रेनिंग अकैडमी हैदराबाद तेलंगाना येथे सुरक्षा गार्ड चे ट्रेनिंगकरीता पाठविण्यात येणार आहे. सदर युवकांचे सुरक्षा गार्ड, चे प्रशिक्षण पुर्ण होताच त्यांना भारतातील विविध कंपनीमध्ये स्थायी स्वरुपा ची सुरक्षा गार्डची नोकरी देण्यात येणार आहे.

 मा. वरिष्ठांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी, आमगाव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस दादा लोरा खिडकी  योजने अंतर्गत नक्षल सेल गोंदिया तसेच पोलीस ठाणे- देवरी, चिचगड, केशोरी, नवेगावबांध, डूग्गीपार, सालेकसा ठाणेदार यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जिल्हयातील नक्षल प्रभावित भागातील युवकां ना रोजगाराची संधी उपल ब्ध करून दिली. केलेल्या उल्लेखनीय कार्याचे  मा. वरिष्ठांनी कौतुक व अभि नंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या