Ticker

6/recent/ticker-posts

मौजा मांडेसर येथील ग्रामिण रोजगार हमी योजनेला एनएमएमएस प्रणाली कुचकामी


रोजगार हमी वरील मजुरांच्या मजुरीत १७ रुपयांनी वाढ, १ एप्रिल पासून मजुरांना प्रति दिवस २७३ रुपये मजूरी मिळणार

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

भंडारा :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर प्रदान(अकुशल) कामांवर कार्यरत मजुरांच्या मजुरीत प्रती दिवस १७ रुपयाने वाढ करण्यात आली असून मजुरांना प्रती दिवस २५६ ऐवजी आता २७३ रुपये मिळणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ संपे पर्यंत ही दरवाढ अनुज्ञेय असल्याचे केंद्र शासनाने रजपत्राचे माध्यमातून जाहीर केले आहे. 
             ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरुवात केली असून राज्यात ती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. या योजनेत ५० टक्के कामे ग्रामपंचायत स्तरावर तर ५० टक्के कामे इतर बांधकाम एजेंसी च्या माध्यमातून केली जातात. ह्या योजनेचा केन्द्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे कामांचे नियोजन देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. ग्रामसेवकाचे मदतीस ग्रामसभेतून रोजगार सेवकाची निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र विभाग कार्यरत असून १५ लक्ष रुपयापर्यंत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यास देण्यात आले आहेत. 
       "महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांकडून केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर यंत्रसामग्रीने केल्या जाणाऱ्या कामांना कुशल कामे संबोधले जाते. या कामांचे प्रमाण ६० ला ४० ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेतून वयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे केली जातात. १ जानेवारी २०२३ पासून केंद्र शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी चे कामावर काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून पहिल्या पाळीत हजेरी व दुसऱ्या पाळीत छायाचित्र काढून ते रोजगार हमीच्या एनएमएमएस मोबाईल ॲप वर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यामुळे मजुरांची कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. 
               महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना प्रती दिवस २५६ रुपये मजुरी मिळत असे. सध्या जीवनावश्यक वस्तू व इतर वस्तूत भाववाढ झाल्याने महागाई वाढलेली आहे. २५६ रूपये प्रती दिवस मजुरीत मजुरांना काम करणे परवडेनासे झाले असल्यामुळे केंद्र शासनाने याची दखल घेऊन १ एप्रिल २०२३ पासून रोजगार हमी योजनेचे कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत प्रती दिवस १७ रुपये वाढ केली आहे. त्यामुळे आता २७३ रुपये प्रती दिवस मजुरांना मजुरी मिळणार आहे. 
*ग्रामीण परिसरात एनएमएमएस प्रणाली कुचकामी(चौकट)*
 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर कार्यरत मजुरांची एनएमएमएस ॲप वर फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पण ग्रामीण परिसरात नेटवर्क ची समस्या असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कामावर हजर मजुरांचीही गैरहजेरी लागण्याची समस्या निर्माण होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या