Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेवकांनी गाव नमुना ८ अ व इतर दस्तावेजमध्ये केली हेराफेरी

बनावटीकागदपत्र तयार करून शासनाची केली दिशाभूल

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

गरजूंना डावळून ज्या लोकांना घरकुलाची आवश्यकता नाही अशा लोकांना देण्यात आले घरकुल

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

गोंदिया : गोंदिया जिल्हा तिरोडा तालुक्यातील ग्राम भंबोडी येथील घरकुल वितरणात ग्राम पंचायत तसेच ग्रामसेवक राउत यांनी गाव नमुना ८- अ व इतर दस्तावेजामध्ये हेराफेरी व बनावटी कागदोपत्र तयार करुन शासनाची व भंबोडीच्या नागरिकांची दिशाभूल केली. याप्रकरणी भंबोडी येथील ग्रामसेवक तसेच ग्राम पंचायत यांचे कार्यकाळाची चौकशीचे आदेश पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया स्मिता बेलपत्रे यांनी दिले आहेत.
भंबोडी येथे ज्या लोकांचे पक्के घर आहेत, त्यांना घरकुलाची आवश्यकता नाही तशा लोकांना नमुना आठ (८) अ मध्ये हेराफेरी करुन घरकुलाचा लाभ देण्यात आला. परंतु ज्या लोकांचे घर कच्चे आहेत, त्यांना आवश्यक असुनसुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. ज्या लोकांजवळ ५ ते १० एकर शेती आहे. अशाही लोकांना घरकुल देण्यात आले. मोल मजुरी करणाऱ्या, गरीब, हातावर पोट असलेल्याना घरकुलाचा लाभ न देता ज्या लोकांना शासकीय नौकरी तसेच पेंशन लागु आहे. अशा लोकांनादेखील घरकुलाचा लाभ देण्यात आला. काही लोकांनी तर घरकुल बनविलेच नाही. पण दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले व पैशाची उचल केली. ग्राम पंचायत भंबोडी येथे संबंधित विभागाचे अधिकारी गावामध्ये आले नाहीत व चौकशी देखील केली नाहीव घरकुले देण्यात आली.
सदर प्रकरणाची तक्रार भंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ता दुर्गाप्रसाद मोहन डिंकवार यांनी खंड विकास अधिकारी पंचायत समिती तिरोडा, जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया व मुख्यमंत्री, सचिवालय कक्ष अधिकारी क्रमांक १०२ यांना दिली होती. ग्रामसेवक व ग्राम पंचायत कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ११ एप्रिल २०२३ ला पत्र क्र./प्रस्तुत/कावि/१४२/२०२३ नुसार चौकशीचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.दोषींवर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे तालुक्यासह जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या