Ticker

6/recent/ticker-posts

दवडीपार ग्रांम पंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गावातील कर्तबगार महिलांचा केला सत्कार

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

गोदिया : गोरेगाव - दि ३१ मे 23 तालुक्यातील दवडीपार ग्रांम पंचायत येथे आज दिनांक ३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रम निमित्त शासननिर्णयानुसार ग्राम पंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार ने दुर्गेश्वरी नरेंद्र बिसेन व जयकला संजय बोपचे यांना सन्मानित करण्यात आले.
         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं.स.सदस्य तथा भारतीय जनता पार्टी तालुका गोरेगाव चे अध्यक्ष श्री.डॉ.एस.के.कटरे होते पुरस्कार वितरक ग्राम पंचायत दवडीपार चे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच श्री.बि.एम.कटरे गुरुजी यांच्या हस्ते देण्यात आले प्रमुख अतिथी म्हणुन उपसरपंच श्री.साहेबलालजी बिसेन,सदस्य श्री.कुवरलालजी कटरे,सदस्या सौ.सुनिताबाई कटरे,सौ.सुनिताबाई बिसेन,सौ.दिपकलाबाई पटले,पोलीस पाटील सौ.दीपमालाताई नांदगाये,श्री.अरुण कटरे गुरुजी,अंगणवाडी सेविका सौ.मोतनबाई बिसेन,सौ.गिताबाई राऊत, सौ.द्रोपदीबाई बिसेन,आशा सेविका सौ.सीमाताई सोनवाणे,संगणक परिचालक श्री.गौरीशंकर पटले,कर्मचारी श्री.नीलकंठ कोल्हटकर तसेच सौ.जयशीलाबाई नांदगाये आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद शाळा दवडीपार येथील मुख्याध्यापक श्री.एस.एस.बिसेन सर यांनी राजमॉता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्य वर आपले मनोगत व्यक्त केले.
         कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा परिषद शाळा दवडीपार येथील मुख्याध्यापक श्री.एस.एस.बिसेन सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या