२ लाख ३८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरी येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने कारवाई केली. यावेळी आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार ९३० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सावरी येथील रहिवासी भिमराव गोविंदा लाडे यांच्या घरी जुगार अड्डा चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे १७ जून रोजी पोलिसांनी भिमराव लाडे यांच्या घरी धाड घातली. त्यावेळी त्यांना जुगार अड्डा सुरू असल्याचे व येथे भिमराव गोविंदा लाडे ( ६५) रा. सावरी, अमरदिप पंढरी वालदे ( ४६), अशोक पांडुरंग गजभिये ( ५५) दोघेही रा. जवाहरनगर, होमचंद नामदेवराव धकाते ( ४२), प्रमोद तुळशीपाल सतदेवे ( ३२), निलेश ईश्वरदास जांभुळकर ( ३६) तिघेही रा. भंडारा, सुजित लक्ष्मण कावळे ( ५० ) रा. पेट्रोलपंपठाणा, भारत जोंधरू बारई ( ४०) रा. राहुली हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व ३ मोटारसायकल असे एकूण २ लाख ३८ हजार ९३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या पथकाने केली.


0 टिप्पण्या