दि.28 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या रक्षाबंधनानिमित्त कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले लिखित काव्यरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
रक्षाबंधन
बहीण राखी प्रेमाने बांधते ।
भाऊ बहिणीचे करितो रक्षण ।
भावाच्या प्रेमाची ही साक्ष ।
भाऊ बहिणीचे रेशमी बंधन ॥
हाताला रेशमी हा धागा ।
सुख-दुःखाचा असे सोबती ।
भाऊराया देई ओवाळणी ।
भाऊ बहिणीचे गीत गाती ॥
कधी भांडण,कधी रुसवा ॥
पण द्वयांच्याही मनात माया ।
बहिणीच्या रक्षणाची हमी ।
एकमेकांविषयी असे दया ॥
भाऊला लाभो आयुष्य उदंड ।
हीच बहिणीची असे शुभेच्छा ॥
राखी पीर्णिमेच्या शुभदिवशी ।
देई रक्षाबंधनाच्या सदिच्छा ॥
समता गौरव पुरस्कार प्राप्त
कवी
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती .८०८७७४८६०९


0 टिप्पण्या