श्रीनगर गावाचा गावठाण मध्ये समाविष्ट करा
ग्रामसेवक मनोज गेडाम यांची तात्काळ बदली करा ग्रामसभेत ठराव पारित
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -तालुक्यातील पहेला श्रीनगर गटग्रामपंचायत ची तहकूब ग्रामसभा ग्रामपंचायत पहेला येथे दिनांक 27 ऑगस्ट 2026 ला दुपारी 12 वाजता घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थानी प्रशासक मंगला ठवकर उपस्थित होत्या. तर ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत सचिवाचे काम कारकून अरुण खराबे यांनी पाहिले. रोजगार सेवक आशा ठवकर यांनी जी रामजी योजनेबद्दल माहिती सांगितली .तर कृषी सहाय्यक अभिषेक हटवार यांनी महिला सक्षमीकरण याबद्दल माहिती दिली. या सभेत ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित करून श्रीनगर हे गाव मागील 70 वर्षापासून अकृषिक क्षेत्रात वसले असून त्या गावाला ग्रामपंचायतचा कर व कृषी कर द्यावे लागते त्यामुळे त्या गावाचा गावठाण मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी श्रीनगर येथील नागरिकांनी लावून धरली. त्याचप्रमाणे मुत्री घरांचे दरवाजे, श्रीनगर येथील मशीन भूमी मधील रोडचा प्रश्न, बेरोजगारांकरता स्पर्धा परीक्षांची करिता 50 हजाराची पुस्तके खरेदी करणे, श्रीनगर येथील अकृषिक कर कमी करणे, ग्रामसेवक मनोज गेडाम यांना हटविण्यात यावे, श्रीनगर येथील सिमेंट रस्त्यांचा प्रश्न, हायवे वरील स्टेट लाईन, सरू घुबडे ते धीरज सुखदेवे यांच्या घराजवळील नालीवर कव्हर , अरुंद रस्ता दुरुस्त करणे,श्रीनगर गावाच्या गावठाण मध्ये समाविष्ट करणे, अशा अनेक प्रश्नावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासकाला धारेवर धरले, यावेळी पहेला व श्रीनगर येथील नागरिक व महिला,मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या