कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात आधुनिक भारताचे पितामह स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृती दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी १ जानेवारी ला पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. विधवा माता संगोपनासाठी घरीच बालगृहाची स्थापना केली. अस्पृश्यता निवारणासाठी घरचा पाण्याचा हौद खुला केला. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचा समाधीस्थळ शोधून काढून प्रथम जयंती साजरी केली. तथा तृतीयरत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसुढ, सार्वजनिक सत्यधर्म(सत्सार) इत्यादी ग्रंथांची निर्मिती करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याने ते दीन दलितांचे कैवारी होते. असे सांगितले. त्यांनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांना शिकवून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. असा मूलमंत्र देऊन परिवर्तन घडवून आणले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी.एल. वैद्य, शालिक जांभूळकर, कमल गणवीर, शीला कोटांगले, यांचेसह गावातील प्रतिष्ठित व गणमान्य व्यक्ती, समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रामप्रसाद देशपांडे यांनी तर आभार शीला कोटांगले यांनी मानले.


0 टिप्पण्या