प्रतिनिधी चित्रा न्युज
पालघर - नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अक्षय भालेराव यांची जातीयवादी, सनातन, मनूवादी प्रवृत्तीच्या, सवर्ण जातीच्या गावगूंडानी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याबद्दल निर्घूण हत्या केली.
वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्ह्याच्यावतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध धडक मोर्च्यात पक्षाचे शहर, तालुका, महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, जिल्हा महिला आघाडीचं यांचं विशेष सहकार्य लाभलं. मोर्च्यात जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रखरखत्या उन्हात कार्यकर्त्यांच्या निषेध व आक्रोश च्या घोषणांनी पालघर शहर दणाणून टाकले. सरकारला जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर मोर्चाची धडक दिली. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यामार्फत अक्षयच्या खून्याला लवकर फाशी देण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. मोर्च्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या