प्रतिनिधी चित्रा न्युज
नांदेड :- जिल्ह्यातील बोंढार या गावी भीम जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या बौद्ध युवकाचा गावातील जातीवादी समाजकंटकांनी तीक्ष्ण हत्याराने भूक असून निर्घृणपणे खून केला. तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथे गिरिधारी तबघाले या मातंग समाजाच्या व्यक्तीचा तीन हजार रुपयांच्या व्याजाच्या पैशासाठी खून केला. तसेच तिसरी घटना मुंबई येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठात कम्प्युटर इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा वस्तीगृह रक्षकाने बलात्कार करून खून केला. या खुनांचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून आंबेडकरी समाजात संतापाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलितांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना सरकार व गृह विभाग या होणाऱ्या अत्याचारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी बीड पूर्वच्यावतीने बीड जिल्हा अध्यक्ष बाबुराव मस्के, अंबाजोगाई शहराध्यक्ष अमोल हातागळे, जिल्हा महासचिव अक्षय भुंबे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी एक तास ठिय्या दिल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के बोलताना म्हटले की, राज्य सरकार हे दलितांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यात अपयशी झाली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
शहराध्यक्ष अमोल हातागळे यांनी बोलताना म्हटले की, सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल. जिल्हा महासचिव अक्षय यांनी मयत अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करून त्याच्या भावाला शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे व पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली.
अजय वाघमारे यांनी म्हटले की, यापुढे जर दलितांवर अत्याचार झाले तर जशास तसे तर दिले जाईल. तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी सरकार हे आरोपींना पाठीशी घालत असून त्यांना वाचवण्याची प्रयत्न करत आहे असल्याचा आरोप केला. आमचे मुडदे पाडले जात असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ब्र शब्दही काढत नाहीत. त्यांना दलित फक्त मतांपुरते हवे असतात का ? अशी टीका अनिल डोंगरे यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे, युवा जिल्हा अध्यक्ष बाबुराव मस्के, युवा शहराध्यक्ष अमोल हातागळे, युवा महासचिव अक्षय भुंबे, परमेश्वर लांडगे, अनिल कांबळे, अजय वाघमारे, अरुण बनसोडे, शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे, अस्लम पठाण, अश्रफ बागवान, रत्नदीप सरवदे, अविनाश घनघाव, राजरत्न जोगदंड, लक्ष्मण ओव्हाळ, यशवंत जोगदंड, अमरजीत ओव्हाळ, नितीन गोदाम, करण घनघाव, प्रकाश हातागळे, राहूल भुंबे,विजय कांबळे,उमेश शिंदे,सोमनाथ वैरागे,आनंद कांबळे,सुमित खरात,संकेत हातागळे,अजय जोगदंड,तोसिफ शेख,राहुल हजारे,सुरेश सरवदे, जितेंद्र सोनवणे, शिवाजी सोनवणे, राजू इंगळे, किशोर घाडगे,बबलू सरवदे,रवी सोनवणे, नितीन खलसे, संकेत मस्के,दादा इंगळे,सुशील गायकवाड, सुजित घाडगे, प्रशांत ढगे,सचिन सोळंके विजय गायकवाड,मयूर कांबळे,गोविंद सरवदे,गोविंद मस्के,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या