Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती अर्ज अंतिम मुदतीपुर्वी सादर करावेत


प्रतिनिधी चित्रा न्युज
सातारा : शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शिष्यवृत्ती / शिक्षण फि या योजनेचे अनु. जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज  महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal)अर्ज व नवीनअर्ज नोंदणी दि. 22 सप्टेंबर 2022 पासून  सुरुवात करण्यात आलेली आहे.
जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे इत्यादी कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 30 जून 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सातारा जिल्हृयातील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2022-23 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज अंतिम मुदतीपूर्वी भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत.तसेच सदरचे अर्ज संबधीत महाविद्यालंयानी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करुन शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत.
संबंधीत महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करावेत. असे आवाहन नितिन उबाळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे.


---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या