Ticker

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी गुरु शिष्य स्नेह सोहळा सम्प्पन्न.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : दिनांक २९-०७-२०२६गुरुपौर्णिमा मंगलदिनी दैनिक बहुजन सौरभ यां कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रतिभावन्त प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या सर्व क्लावन्तनंतर्फे गुरुशिष्य स्नेहसम्मेलन सोहळा उत्साहात पार पडला.
  कार्यक्रमाच्या उदघाटीका बहुजन सौरभ दैनिक वृत्तपत्राच्या निवासी संपादिका आयु. संध्याताई राजूरकर, अध्यक्ष आयु आंबेडकरी साहित्यिक लेखक कवि वक्ते विनायकरावं जामगडे, प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते आयु. धम्मपालजि आवळे, नरेशजी चोखांद्रे पत्रकार आणी कलावन्त संजयजी खांडेकर, शाहीर डॉ. शंकररावं भोंगेकर उपस्थित होते.प्रथमताहा बुद्ध ज्योतिबा फुले सावीत्रीआईफुले छत्रपती शाहूमहाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानां पुस्पमाला अर्पण दिपप्रज्वलीत करून सांगितशिक्षक गायक वणकर गुरुजी यांनी पाहुण्यांच्या उपस्थित्यांच्या स्वागतगीतानी सुरुवात केली शॉल  आणी शाहीर दिवँगत खुशाल मुरारी खांडेकर यांचे समृतीप्रित्यर्थ शाहीर संजय खांडेकर पत्रकार यांचेकडून स्मृतिचिन्ह पाहुण्यांना आणी सर्व कलवांताना प्रदान करण्यातआले.
 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय संत महापुरुषांच्या वैचारिक चळवळीचे कवि गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता  लेखक वक्ते अनिरुद्ध शेवाळे यांचे सर्व शिष्य, धम्मचक्र तामगाडगे, संजय वानखेडे, सुरेश देशभ्रतारं, डॉ शिलवंत मडामे सर, गायक रविबाबू भावसार , धीरज निकाळजे, गायिका प्रबोधनकार सूर्यकांता पाटील, लोमेश कावळे, मदन रामटेके, सुरेंद्र खोब्रागडे, इतर सर्व प्रबोधनकार कलावंतांनी गुरुस्थानी अनिरुद्ध शेवाळेनचा सत्कार केला यांचप्रसंगी प्रतिभावन्त प्रबोधनकार कला साहित्य संघांचे केंद्रीय उपाध्यक्ष कवि बी. ज्ञानदीप  बागडे यवतमाळ यांनी अनिरुद्ध शेवाळे यांना आठवण म्हणुन सत्कार करताना पार्श्वगायक गुरुबंधू आनंद शिंदे सोबतचे  फोटोचित्र  भेट केले. अनिरुद्ध शेवाळे यांनी सुप्रसिद्ध ब्यांजोवादक कन्हय्याजी मेश्राम, ढोलक वादक राजू गोदडे, तबलावादक मसराम राहुल भाऊ यांचे शॉल स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला. सर्व प्रबोधनकार गायक कवि संगीतकार कलवांतानी गायन केले. स्रोतेमंडळी साहित्यिकांचे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली हा सर्व कार्यक्रम लोकजत्रा यां चॅनल वरती शूट करण्यात आला कॅमेरामन शुभम वाटकर यांचे शॉल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या