सामान्य मानसांच्या खिशाला लागली कात्रण
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असते. पण १४ जून उजाडला तरी अजूनही दमदार पावसाचे आगमन झालेले नाही. याचा परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. पालेभाज्यांचे दर वाढले असून व्यापाऱ्यांना फायदा होत असला तरी ग्राहकांच्या खिशाला कात्रण लागत आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने जमिनीतील पाणी पातळी वाढली होती. नदी नाले खळखळून वाहत होते. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी भात, तुर, हरभरा, गहु, या पिकांसह भाजीपाल्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली. गेल्या महिन्यात बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भावात घसरण झाली होती. परंतु सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून पुढील खरीप पेरणीसाठी शेतकरी शेती तयार करीत आहे.
दरम्यान भाजीपाल्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. लागवड घटल्याने बाजारात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भाषत आहे. परिणामी गृहिणीचे अंदाजपत्रक बिघडले आहे. बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भीडले आहेत. जून महिना अर्धा झाला असला तरी पाऊस कोसळत नसल्याने दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे या दरवाढीमुळे जनसामाण्यांच्या खिशाला कात्रणं लागली आहे.


0 टिप्पण्या