चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
अहमदनगर :- शिक्षणाधिकारी मा. अशोक कडूस व अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या निलंबनाची फाईल दोन महिन्यापासून शालेय शिक्षण मंत्री यांच्या मंत्रालयातील टेबलवर पडून आहे. त्यामुळे वरील बाबींची त्वरित दखल घेऊन मंत्री महोदय यांनी त्वरित त्यांना निलंबित करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मा. शिक्षण मंत्री यांच्या बंगल्यासमोर उपोषणास इशारा तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा परिषदेतील बनावट शिक्षक मान्यता संदर्भातील विषय डिसेंबर 2022 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी मा.मंत्री महोदयांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आश्वासन सभागृहात दिले होते. त्यानुसार शिक्षण आयुक्त, पुणे यांनी शासनास मार्च 2023 ला निलंबनाचा अहवाल शासनास सादर केला आहे . शिक्षणाधिकारी व अधीक्षक यांच्या विषयी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य न करणे, वैद्यकीय बिले बेकायदेशीरपणे काढणे, सदरचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्यास ते चौकशीत अडथळा निर्माण करीत आहे. इ. अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या त्यांची गंभीर दखल मा. शिक्षण आयुक्त यांनी घेतली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर 1 ते 4 दोषारोपत्र ही शासनास सादर करण्यात आले आहे. कडूस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असताना अनेक बेकायदेशीर मान्यता दिल्या असलेले समजते, त्यामुळे त्यांची चौकशी होऊन त्यात ते दोषी आढळल्याचे समजते. तसेच नगर येथे कार्यरत असताना त्यांच्यावर सध्या विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.
तसेच कडूस यांना तीन अपत्य असतानाही दोनच अपत्य दाखवून त्यांनी नोकरी मिळविली आहे. त्यामुळे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात यावे यासाठी डि. के. गुंजाळ यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे याचिका क्र. O. A.474/19 दाखल करून सदर याचिकेचा लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सदरचे वरील दोन्ही अधिकारी हे वारंवार मंत्रालयात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन निलंबन टाळण्यासाठी मंत्र्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे येथे 15 दिवसात वरील अधिकारी निलंबित न झाल्यास शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा राम खाडे यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या