चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
औरंगाबाद :- शहराचे नामवंत तरुण तडफदार कायद्याची चांगली माहिती असणारे अॅड. श्री. हरीविठ्ठल यांचा त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मानवाधिकार परिषद महाराष्ट्र व अंतराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटना महाराष्ट्र तर्फे सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.
औरंगाबाद शहराचे नामवंत तरुण तडफदार कायद्याची चांगली माहिती असणारे अॅड. श्री. हरीविठ्ठल यांचा मानवाधिकार परिषद चे वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व अंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री. के. ए. काजी व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष व अंतराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री. ईलीयास शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन यांचे सत्कार करून अभिनंदन केले. अॅडव्होकेट श्रीहरीविठ्ठल यांना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. व ते पैसांची अपेक्षा न करता गरिब व असहाय्य लोकांची मदत करतात व त्यांची बाजू कोर्टासमोर चांगल्या पद्धतीने ठेऊन न्याय मिळवून देतात. त्यांची ही जिद्दीने काम करण्याची कार्यपद्धती व मनमिळावु स्वभावामुळे त्यांना औरंगाबाद जिल्हा कोर्टात चांगली प्रसिद्धी मिळत आहे. असे अंतराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री के. ए. काजी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले


0 टिप्पण्या