प्रतिनिधी चित्रा न्युज
लातूर - जिल्ह्यातील रेणापूर येथे अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
गिरीधर तबघाले या मातंग बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10 % टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात त्यांना काठीने मारहाण केली.
तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे आरोपीचे बळ वाढले व त्यांनी
दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिधर तबघाले याच्या घरी हल्ला चढवला. यात आरोपींनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला.
पोलिसांनी तेव्हाच तातडीने कारवाई केली असती तर मातंग बांधवाचा जीव गेला नसता.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी मराठवाडा महासचिव संतोष भैया सुर्यवंशी, युवक प्रदेश सदस्य अमोल लांडगे, रेणापूर येथील मातंग समाज बांधव मयत गिरधारी केशव तपघाले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. व या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून सर्वप्रकारची मदत केली जाईल अस आश्वस्त केले. यावेळी निलेश बनसोडे, विशाल वाहुळे,राहुल सोनवणे,भरत महामडगे(मामा), कृष्णा वाघमारे, ॲड. विठ्ठल खोडके आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या