मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो, 9860179256
पुणे :- दिनांक 5 जून नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामधे भिमजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी अक्षय भालेराव याची गावातील गावगुंडांनी जातीय द्वेशातून निर्घृण हत्या केली.
गावामधे वर्षानुवर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत नव्हती कारण जयंती ला गावातील कथित उच्चजातीय लोकांचा विरोध होता. परंतू यावर्षी अक्षय भालेराव व त्याच्या साथिदारांनी वंचित बहुजन आघाडी च्या वरिष्ठ पदाधिकारी तथा इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊन शांततेत भिमजयंती साजरी केली. या घटनेचा द्वेश मनात ठेवत संधीच्या शोधात असलेल्या जातीयवादी गावगुंडांनी संधी मिळताच अक्षय भालेराव या नवयुवकाची हत्या केली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या घटनेबद्दल आक्रोश व्यक्त होत असतांनाच वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी, प्रफुल गुजर, अनिताताई चव्हाण, विशाल कसबे व परेश शिरसंगे सर्व पुणे शहरावर जबाबदार पदाधिकारी आणि आजी माझी कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलन येथे करण्यात आले .
या हत्याकांडातील इतरही आरोपिंना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने करण्यात आली या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या