Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


उस्मानाबाद :-  दिनांक  5 जून  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंडार हवेली गावात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीयवादी गाव गुंडावर कडक कार्यवाही या बाबत.चे निवेदन देण्यात आले  महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंढार हवेली या गावात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावात मिरवणूक काढली व त्यांच्या कुटुंबातील आई-वडील भाऊ 4  मारहाण करून गावात दहशत निर्माण केली ही बाब अत्यंत संतापजनक असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जातीयवाद मिटलेला नाही याची प्रचिती येते

1) सदर घटनेची उच्चस्तरीय सीआयडी एसआयटी यंत्रेमार्फत चौकशी करण्यात यावी 

2,) अक्षय भालेराव व त्यांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने करावी

3) अक्षय भालेराव यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सदरचा खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा

4) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत तात्काळ सामावून घेण्यात यावे

5) तसेच महाराष्ट्रात दलितावर होणारे अन्याय अत्याचार तात्काळ बंद करून दलितांना संरक्षण देण्यात यावे 

अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उस्मानाबाद च्या वतीने करण्यात येत आहे यावेळी रिपाईचे सोमनाथ गायकवाड; भालचंद्र कटारे ;उदय बनसोडे; मुकेश मोठे; समाधान सरवदे; शितल धावारे; सुशील शिंदे; अमित कटारे सर्व कार्यकर्ते  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या