Ticker

6/recent/ticker-posts

कला शाखेतील करिअरच्या संधीडॉ. विश्वनाथ आवड अकलूज


सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199

सोलापूर :- इयत्ता १२ वी पास झालेल्या सर्वांचे अभिनंदन साहजिकच विद्यार्थी व पालक याचे समोर उभे राहणारा प्रश्न म्हणजे कि १२ नंतर काय करायचे खरे तर १२ वी नंतर विद्यार्थी वर्गाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत तयाटला एक पर्याय म्हणजे कला शाखा. 
खरे तर आज काल कला शाखा शिकून काय उपयोग असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसतात त्या अनुषंगाने काही प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळातच कला शाखा यांचेकडे आज काल पाहण्याच्या दृष्टीकोन हा ट्रेन्ड प्रमाणे बदललेला आहे हे मान्य करूनच बाकीच्या शाखा हि या अवस्थेतून गेलेल्या आहेत हेही ध्यानात घेतले पाहिजे. १९९५ ते २००५ पर्यंत कॉमर्स शखेची अस्वस्था अतिशय भयावह होती तीच नंतर सायन्स शाखेकडे आले आता सद्या कला शाखेची अवस्था तशी आहे पण तरीही या शाखेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  
   मुळातच याला जबाबदार कोण यापेक्षा हे का होते आहे हे पाहणे महत्वाचे आहे. एकदा ट्रेन्ड आला कि पालक आणि विद्यार्थी त्याकडे धाव घेताना दिसतात. त्यामुळे अशा शाखेकडे गर्दी होताना दिसते आहे. हे मान्य करूनही कला शाखेकडे विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे. याचाही विचार पालकांनी करायला पाहिजे आहे. 
कुठल्याही शाखेतून बारावी पास झाल्या नंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेवू शकतो व आपले उतम करियर घडवू शकतो. या शाखेत भाषा सोबतच सामाजिक शास्त्रे ज्यामध्ये इतिहास , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र तर्कशास्त्र , समाजशास्त्र भूगोल इत्यादी विषय आपल्या आवडीनुसार निवडू शकतात. 
     बी.ए. अभ्यासक्रम त्यामध्ये एम. पी. एस. सी.. यूपीएससीचा या परीक्षा, बैंक, सी आर.पी.एफ, आर्मी भरती,  पोलीस दलातील विविध पदे , विक्रीकर अधिकारी, अशा अनेक शासकीय सेवांच्या परीक्षा देता येतात किवा त्याचा अभ्यास करून विद्यार्थी यशस्वी होताना दिसतात. 
    या शाखेत शिकत असताना त्यांना भाषिक एक अभ्यास करावा लागत तसेच स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून सर्व विषयाची तयारी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकप्रकारचे सामाजिक भान अधिक दिसून येते कारण सामाजिक शास्त्राचा एकत्रित अभ्यास करत असल्यामुळे समाजातील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतर समस्यांची जाण निर्माण होते. व ते सोडविण्यासाठी अधिक जागृत होतात. यामुळे उउत्म नागरिक म्हणून समाजात वावरताना दिसतात. समाजकारणात , राजकारणात असे विद्यार्थी पुढे असतात. 
     कला विविध शास्त्राचा अभ्यासामुळे  विद्यार्थ्यामध्ये अनेक गुण विकसित होतात. बी ए ची डिग्री घेत असताना ते संगणक अकौंट अशा प्रकारचे कोर्सेस करू शकतात त्या कौशल्यच्या आधारे स्वतःचा व्यवसाय रोजगार उपलब्ध होवू शकतो. उत्तम संभाषण कौशल्ये, स्टेज डेरिंग , वक्र्तुत्व, निर्णय निर्धारण क्षमता, इवेन्ट मेनेजमेन्ट, अशा अनेक व्यक्तिमत्व विकासातल्या गोष्ठी कला शाखेतून आत्मसात करता येतात. ज्यामुळे आज सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातही मोठ्या संधी निमाण झालेल्या आहेत. 
     आणखी एक महत्वाची गोष्ठ म्हणजे कला शाखेतील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमी खर्च येतो. प्रवेश फी कमी असते सरकारकडून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळतात. त्यामुळे चांगळे करियर बनविता येते. 
कला शाखेतल्या संधी 
१. डीएड , बीएड , एम ए एड करून शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून संधी मिळते आहे आणि येणाऱ्या पुढील काळात शिक्षण क्षेत्रात अनेक संधी आहेत कारण सद्या या शाखेकडे गर्दी कमी आहे त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी अस्वथा निर्माण झालेली आहे. 
२. बी एस डब्लू एम एस डब्लू करता येते यामधून सामाजिक क्षेत्रात कार्य करता येते. 
३. बी ए किवा एम ए . एल एल बी करून वकिली व्यवसाय करता येतो.   
४. एल एल एम , डी एल एम डी ती एल सारखे कोर्स करून उतम करियरची संधी उपलब्ध होते. 
५. फँशन डिझायनिग , इंटर्रीयर डिझायनिग , अनिमेशन सारखे कोर्स करुन स्वताचे व्यावसाय उभे करता येतात. 
६. एम बी ए करून मार्केटिंग क्षेत्रात आपले नाव निर्माण करता येतात 
७. फोरेन भाषा कोर्से करून त्या संधी मिळतात. 
८. उत्तम संभाषण कौशल्ये मिळाल्यामुळे कॉल सेंटरवर जॉब मिळू शकतो.
९. बी पी एड , एम पी एड करून फिजिकल शिक्षकी नोकरी मिळू शकते किवा विवीध खेळांचे स्वताचे प्रक्षिक्षण वर्ग सुरु करता येतात.   
१०. मास कम्युनिकेशन किवा पत्रकारिता यासारखे कोर्से करून पत्रकारिता वार्ताहर , टीव्ही रिपोर्टर , न्यूज अन्कर , न्यूज पोर्टल, रेडीऑ जाकी, बातमीदार अशा अनेक संधी मिळू शकतात. 
११. ग्रंथालय पदविका करून ग्रंथपाल किवा तत्सम नोकरी मिळविता येते.
१२. जाहिरात क्षेत्रात विविध कोर्स करून खूप मोठ्या संधी मिळवू शकतात 
१३.ग्राफिक डिझायनिग करून हजारो रुपये मिळवू शकतात. 
१४ हॉटेल व्यवस्थापन करून नोकरी किवा स्वताचा व्यवसाय उभा करू शकतात 
१५. संगीत, चित्रकला, ललितकला, नृत्यदिग्दर्शन, नाट्य अशा अनेक क्षेत्रात आपले उत्तम करियर करता येवू शकते. 
१६. भाषांचा साहित्यांचा अभ्यास करून निवेदक , सूत्रसंचालक , प्रभावी वक्ता होवून आपले करियर घडविता येते. 
१७. लेखक ,कवी ,  संवादक , दुभाषा , अनुवादक होवू शकता त्याच्या कार्यशाळा आयोजित करून उतम करियर निर्माण करता येते.
१८. राजकीय समीक्षक किवा अभ्यासक , निवडणूक व्यवस्थापक , याही संधी उपलब्ध होतात 
१९. पर्यटन क्षेत्रात उत्तम गाईड , सहल नियोजक याही क्षेत्रात आपले उत्तम करियर करता येवू शकते.   
      याशिवाय अनेक संधी कला शाखेतून निर्माण होतात. शेवटी पालक आणि विद्यार्थी यांनी सारासार विचार करून व पालकांनी पाल्याच्या मानसिकतेचा विचार करून त्याला विकसित होण्याची संधी द्यायला हवी आहे. केवळ शेजारचा मुलगा अमुख शाखेत गेला म्हणून आपलाही जायला हवा हि मानसिकता सोडून दयावी लागेल. 
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या