Ticker

6/recent/ticker-posts

आमदार निकोले यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

मेहुल भानुशाली जिल्हा प्रतिनिधी ठाणे चित्रा न्यूज मो.न : 7039016364

कल्याण :  काही दिवसांपूर्वी कल्याण येथील अल्पवयीन मुलाला जमावाने विवस्त्र करून धिंड काढत मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी या पीडित मुलाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून देशाची एकता अखंडता टिकवणे ही आपल्या सर्वांची जवाबदारी आहे. दोन समाजात तेढ निर्माण नाही झाली पाहिजे. सोशल मिडियावर येणाऱ्या पोस्टची शाहनिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया द्या. देवीदेवता किंवा महापुरुषांबद्दल ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास पोलीस
स्टेशनमध्ये तक्रार करा. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे झालेल्या अन्यायाचा विषय मांडण्यात येईल. तसेच हा विषय विधानसभेत मांडून या पीडित मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरकारने देखील अशा घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, अजिंठा फाउंडेशन अध्यक्ष अजय सावंत, बाबा रामटेके, कॉम्रेड सरपंच कविता वारे, कॉम्रेड दुहिता जाधव, राम शेरे, कॉम्रेड पिके लाली आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या