Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ९ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. १९ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   ज्येष्ठ
पक्ष :    कृष्ण             
तिथी :  षष्ठी (१६.२०) ~ सप्तमी                                     
वार : शुक्रवार
नक्षत्र : धनिष्ठा (१७.००) ~ शततारका 
राशी : मकर (०६.००) ~ कुंभ 

*स्वामी विवेकानंद पुण्यतिथी* (तिथीनुसार)
*श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृतीदिन* 
*क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा स्मृतीदिन* 
जागतिक ऐंटिफॉस्फोलिपिड सिंड्रोमसह
डोनाल्ड डक डे 
कोरल त्रिकोण दिवस, 

६८: रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.
१६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.
१७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१८९० : गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुटीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुटी सुरू झाली.
१९००: क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.
१९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.
१९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९३४ : डोनाल्ड डकचे  चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
१९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९६४ : लालबहादूर शास्त्री यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.
१९८६ : मुंबईत पहिला एड्स रुग्ण सापडला.
२००४: कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

जन्मदिवस
१७८१ : जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक.
१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल 
१९१२: संगीतकार वसंत देसाई 
१९३१: भारतीय लेखिका व राजकारणी, नंदिनी सत्पथी 
१९४७ : किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम महिला आय.पी.एस. अधिकारी व पूर्वराज्यपाल
१९७७: अभिनेत्री अमिशा पटेल
१९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर 
१९८५: अभिनेत्री सोनम कपूर

मृत्यूदिन
१७१६ : बंदा बहादुर, शीख सेनापती.
१९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. 
१९९१ : राज खोसला, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता.
१९९५ : प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
२०००: काँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट

*।। दास-वाणी ।।* 

ऐसे नस्ता जें बोलणें । 
तेंचि वाटे लाजिरवाणे । 
ब्रह्म होऊन संसार करणें । 
हेंहि विपरीत दिसे  ।। 

जो स्वयें ब्रह्मचि जाला । 
तो मागुता कैसा आला । 
ऐसे ज्ञान माझें मजला । 
प्रशस्त न वटे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०६/०८-०९ 

श्रवणाचा उपदेश कानी पडताच खरे तर आपपर भाव कायमचा नष्ट व्हायला हवा. असे घडले नाही तर ते ऐकणे लाजिरवाणे आणि व्यर्थ आहे.
मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतल्यावर पुन्हा प्रापंचिक संसारी गोष्टींमधे रममाण होणे हे अत्यंत विपरीत आहे.

ब्रह्मानुभूती घेतलेला साधक पुन्हा देहभावावर येतोच कसा?  जर तो पुन्हा द्वैतामधे रमण्यास परत येत असेल तर त्याच्या त्या ब्रह्मज्ञानाला तरी काय अर्थ ?

यत् गत्वा न निवर्तंते । 
तत् धाम परमं मम  ।। 
जिथे पोहोचल्यावर परत यावे लागत नाही, ते माझे परम धाम आहे.तीच मुक्ती आहे. असेच भगवंत सांगतात.

बद्धमुक्तनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या